कोल्हापूर,
दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय) : खत वितरकांना कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था
(मॅनेज) हैद्राबाद प्रमाणित एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या 15 दिवसांचा
प्रमाणपत्र अभ्यासक्रम बंधनकारक करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम रामेती, कोल्हापूर
येथे सुरू होत असून इच्छुक खत व कीटकनाशक वितरकांनी आपल्या गावातील कृषी
सहाय्यकाशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी 27 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्जाव्दारे करण्याचे
आवाहन प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यानी केले
आहे.
कोल्हापूर विभागातील विहीत आर्हता धारण न करणाऱ्या खत व
कीटकनाशके वितरकांसाठी तो बंधनकारक असल्याने त्यांचा पुढील परवाना नुतनीकरण करता
येणार नाही. विहीत अर्हता प्राप्त न करणाऱ्या किटकनाशक विक्रेता/वितरकांना 3
महिन्यांचा (आठवड्यातून 1 दिवस अशा प्रकारे 12 दिवसांचा) राष्ट्रीय वनस्पती
स्वास्थ्य प्रबंधन संस्थान हैद्राबाद प्रमाणित किटकनाशके व्यवस्थापन हा प्रमाणपत्र
अभ्यासक्रम बंधनकारक करण्यात आला आहे, असेही त्यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.