कोल्हापूर,
दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): खासगी दुचाकी
वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-FR दि. 18 डिसेंबरपर्यंत संपणे अपेक्षित आहे.
त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दुचाकी नोंदणी मालिका MH09-FS दि. 21 डिसेंबर रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दि. 21
डिसेंबर रोजी सकाळी 9.45 ते 2 या वेळेतच स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक
परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस यांनी दिली.
लिलाव पध्दतीव्दारे वाहन नोंदणी क्रमांकाची
मागणी करतेवेळी खालील सूचनांचे पालन करावयाचे आहे.
पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत
त्या क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा डी.डी. (धनाकर्ष) जोडणे आवश्यक आहे. धनादेश
किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देऊ नये. धनाकर्ष काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS
या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्वीकारला जाणार
नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच धनाकर्ष दि. 21 डिसेंबर रोजी सकाळी
9.45 ते 2 या वेळेत आणून द्यावा. धनाकर्ष शक्यतो STATE BANK OF INDIA (SBI) या
बँकेचाच असावा. धनाकर्षाच्या मागे अर्जदाराचे नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मोबाईल
क्रमांक व मागणी केलेली मालिका पसंती क्रमांक लिहीणे आवश्यक आहे.
एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त
अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा दुसऱ्या दिवशी लिलाव करण्यात येईल. त्यासाठी
अर्जदारांकडून दि. 22 डिसेंबर रोजी जादा रकमेचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाप्यात
सकाळी 9.45 ते 2 या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहील. एक पेक्षा जास्त अर्ज
असलेल्या क्रमांकाचा लिलाव दि. 22 डिसेंबर रोजी दुपारी 4 वा. कार्यालयाच्या सभागृहात
घेण्यात येईल. याची सर्वांनी नोंद घ्यावी. अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच लिलावास उपस्थित रहाण्याची परवानगी
देण्यात येईल. अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी
उपस्थित राहणार असेल तर त्याच्याकडे प्राधिकार पत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे
याची नोंद घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अल्वारिस यांनी कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.