कोल्हापूर,
दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत मॅट्रिकोत्तर व्यावसायिक व बिगर
व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये सन 2020-21 मध्ये प्रवेश मिळालेल्या अनु. जाती व
नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध
करून घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण या कार्यालयाकडे
अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय विभागाशी संपर्क साधावा, असे
आवाहन सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केले आहे.
अनु.जाती,
विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांची महाडीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्ती, शिक्षण फी परीक्षा इ. योजनांच्या
लाभासाठी 3 डिसेंबर पासून ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झाले आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी mahadbtmahait.gov.in या वेब लिंकचा वापर करावा
असे आवाहनही सहायक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी केले आहे.
नोंदणी करताना विद्यार्थ्यांनी त्यांचे बँक खाते NPCIL
शी आधार लिंक करणे आवश्यक आहे. अर्ज नोंदणीकरिता आपल्या महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांचे
सहाय्य घ्यावे. याबाबत संबंधित महाविद्यालयांनीही आपल्या स्तरावरून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याबाबत अवगत
करुन योजनेची आवश्यक कागदपत्रे व अटी याबाबत माहिती द्यावी. याबाबतच्या सूचना
महाविद्यालयाच्या दर्शनी भागात/ नोटीस बोर्डवर देण्यात याव्यात व परिपूर्ण
स्वरूपातील अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास ऑनलाईन मान्यतेसाठी सादर
करावेत. याबाबत कोणत्याही स्वरूपाची हयगय होणार नाही याची दक्षता महाविद्यालयांनी घ्यावी.
मागासवर्गीय
विद्यार्थ्यास शिष्यवृत्ती न मिळाल्यास
महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्था सर्वस्वी
जबाबदार
समाज कल्याण विभागामार्फत
वारंवार पाठपुरावा करूनही महाविद्यालयाच्या स्तरावरून Pending At PFMS अर्ज निकाली
काढणेबाबत गांभीर्याने कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत वरिष्ठ
कार्यालयाचे स्तरावरून वारंवार कार्यालयाकडे विचारणा होत आहे असे असून सुध्दा
महाविद्यालयाचे स्तरावरून ही बाब गांभीर्याने घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे मोठ्या संख्येने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लाभ अवितरीत आहेत. याबाबत
महाविद्यालयाने कार्यवाही न केल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न
मिळाल्यास संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य व संस्था सर्वस्वी जबाबदार राहतील याची
महाविद्यालयांनी नोंद घ्यावी असेही सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.