गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

रेणुका मंदिर; आंबिल यात्रा रद्द जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


 

कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी कोल्हापूर येथील रेणुका मंदिर येथे 7 ते 10 जानेवारी 2021 या कालावधीत होणारी आंबिल यात्रा रद्द करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

कोरोना परिस्थितीमुळे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी सौंदती यात्रा रद्द केली आहे. या यात्रे नंतर साधारण 7 ते 10 दिवसात कोल्हापूर येथील रेणुका मंदिरामध्ये आंबिल यात्रा होत  असते. बेळगाव येथील यात्रा रद्द केल्याने कोल्हापूर येथील आंबिल यात्रेबाबत भक्तांचे मनात संभ्रम निर्माण झालेला आहे.

 कोल्हापूर येथील रेणुका मंदिर याठिकाणी दरवर्षी आंबिल यात्रा मोठ्या प्रमाणात संपन्न होत असते. अद्यापही जिल्ह्यातील कोव्हिड-19 संसर्ग संपूर्णपणे संपुष्टात आलेला नसल्याने यावर्षी आंबिल यात्रेवेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे.  आंबिल यात्रेमुळे भाविकांची गर्दी होवून कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने कोल्हापूर येथील रेणुका मंदिर येथे दि. 7 ते 10 जानेवारी या कालावधीत होणारी आंबिल यात्रा रद्द करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत आहेत.

 आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असेही आदेशा नमुद आहे.

 00 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.