कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) मार्फत
राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY-RAFTAAR अंतर्गत 22 ते 24 डिसेंबर असे तीन
दिवसांच्या ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक संचालक
एन.एस.परीट यांनी दिली.
बुधवार दि. 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते 12.30
वा. ऊस उत्पादनात बियाण्याचे महत्व व त्रिस्तरीय बेणेमळा संकल्पना व अर्थशास्त्र-
व्याख्याते डॉ. सुरेश मानेपाटील, माजी शास्त्रज्ञ, व्ही.एस.आय.पुणे. दुपारी 2 ते
3.30 वा. बेणेमळ्यासाठी हंगामनिहाय वाणांची निवड व वैशिष्टये- व्याख्याते डॉ.
आर.एम. गरकर, ऊस पैदासकार, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव जि. सातारा.
गुरूवार दि. 23 डिसेंबर
रोजी सकाळी 11 ते 12.30 वा. बेणेमळ्यासाठी बियाणे स्त्रोत, बियाणे निवड व लागवड
तंत्रज्ञान- व्याख्याते डॉ. सुरेश मानेपाटील, माजी शास्त्रज्ञ, व्ही.एस.आय.पुणे.
दुपारी 2 ते 3.30 वा. ऊस बिजोत्पादनामध्ये सहकारी साखर कारखान्याची भूमिका-व्याख्याते
श्री. विलास जाधव, क्रांती सहकारी साखर कारखाना, कुंडल,जि. सांगली.
शुक्रवार दि. 24 डिसेंबर
रोजी सकाळी 11 ते 12.30 ऊस बेणेमळा यशोगाथा- व्याख्याते डॉ. सुरेश कबाडे, शेतकरी
आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली. दुपारी 2 ते 3.30 वा ऊस रोपवाटिका निर्मिती व
व्यवस्थापन- व्याख्याते रविंद्र पाटील, उदगांव, मोरया नर्सरी, उदगाव.
या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये
सहभागी होण्यासाठी आपल्या गावातील कृषि सहाय्यक यांच्याकडून आवश्यक लिंक मिळवावी. जास्तीत-जास्त
शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. परीट यांनी केले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.