कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय): बचत गटाच्या महिलांनी कोव्हिड-19 च्या काळात उल्लेखनीय
कामगिरी केलेली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून निधी एकत्रित करून
शासनाला दिला आहे . बचत गटातील महिलांनी कर्ज घेवून अनेक छोटे मोठे उद्योग व्यवसाय
उभे करावेत त्यासाठी काही सहकार्य लागत असेल तर केले जाईल . माविमने WASH प्रकल्पमध्ये चागले
काम केल्यामुळे गौरविण्यात आलेले आहे . माविमने ICICI बँके, सारस्वत बँक यांच्या मार्फत बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करू
दिलेले आहे, असे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांनी
यावेळी सांगितले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या ACCS ऑनलाईन पोर्टल उद्घाटन श्रीमती ठाकरे यांच्या
हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी केडीसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा ए .बी .माने, रिजनल रिसोर्स पर्सन
विलास बच्चे, जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे, संचालक अनिल तराळ, ACCS ऑनलाईन पोर्टल योगेश भट, RHS,ICICI बँक अमित पाटील , सारस्वत बँकेचे व्यवस्थापक
विक्रम परीट आदीजण उपस्थित होते.
श्रीमती ठाकरे यांच्या हस्ते संयुक्त देयता समूह (JLG) यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.
आयसीआयसीआय यांनी ज्या बचत गटांना जास्त लिंकेज केले आहे त्यांना धनादेश वाटप
करण्यात आले . सारस्वत बचत गटांना धनादेश वाटप करण्यात आले श्रीमती ठाकरे यांनी
कोडोली मधील रामकृष्ण अग्रो व्हीजेटेबल आणि फूड प्रोडक्टसयाला भेट दिली. रामकृष्ण
अग्रो व्हीजेटेबल आणि फूड प्रोडक्टसचे अक्षय शिंदे यांनी स्वागत करून संस्थेची
माहिती देताना म्हणाले, सपूर्ण प्रोडक्टस हे स्वतः तयार केले जातात त्यामध्ये
शुद्ध तूप ,गोअर्क ,अमृतधारा ,फेसपाक ,शाम्पो ,उटणे ,पित्तनाशक चूर्ण ,बीटजाम ,पपई
जाम ,जंगली शुद्ध मध ,गवती चहा पावडर ,तुळस पावडर इ. त्यानंतर बीट व इतर
वस्तूपासून अनेक प्रकारचे फायदे होतात.
महिला कुटुंब व ग्रामविकास लोकसंचलित साधन केंद्रातील आळते गावातील
श्रीगणेश स्वय सहाय्यता महिला बचत गटांनी सुरु केलेल्या बेकारी व्यवसायास भेट दिली
सुरवातील सर्व महिलांनी अध्यक्ष यांचे स्वागत केले. व्यवस्थापक यांनी सी एम आर सी
ची माहिती दिली त्यानंतर श्रीगणेश बचत गटाच्या अध्यक्षानी सांगितले की गटाची
स्थापना 2010 मध्ये करण्यात आली आहे .सुरवातीला गटात फक्त 10 महिला होत्या
सद्यस्थितीत बचत गटात 20 महिला आहेत बचत गटाची मिटींग दरमहा प्रत्येक सभासदाच्या घरी घेतली जाते. गटातला बँक
कर्ज हे सुरवातीला कमी मिळाले होते त्यामध्ये सर्व सभासदांनी कर्ज रक्कम मिळाली
होती. परंतु कोणताही व्यवसाय सुरु केला
नाही परंतु जस जसे माविमच्या सह्योगीनीने महिलांना उद्योग व्यवसायबाबत मार्गदर्शन केल्यानंतर
महिलांनी आपण ही व्यवसाय सुरु करावा असे ठरविले .
जिल्हा समन्वय अधिकारी श्री. झिंजाडे म्हणाले,
कोल्हापूरमध्ये सद्यस्थितीत
माविम अंतर्गत १०८ गावात, १ महानगरपालिका व 9 नगरपरिषद मध्ये 3886 बचत गटाच्या
माध्यमातून 56630 महिलांचे संघटन करण्यात आलेल आहे. बचत गटाच्या माध्यमातून
महिलांचा सर्वागीण विकास साधण्याचे काम केले जाते. सद्यस्थितीत जवळपास 3540 बचत
गटांना आजअखेर 315 कोटी कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे त्याची परतफेड देखील
सद्यस्थितीत 99.2 टक्के इतकी आहे. चालू आर्थिक वर्षात 925 बचत गटांना 23.80 कोटी
बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिलांनी कर्ज घेवून अनेक छोटे मोठे उद्योग
व्यवसाय सुरु केले आहेत. समान व्यवसाय करणाऱ्या महिलांचे सूक्ष्म उपजीविका आराखडा
स्थापन करण्यात आलेले आहेत. स्मार्ट प्रकल्प अंतर्गत 6 लोकसंचलीत साधन केंद्रातून
6 प्रस्ताव ऑन लाईन सादर करण्यात आलेले आहे. DAY-NULM कार्यक्रम अंतर्गत शहरात बचत गटाच्या
माध्यमातून महिलांचे संघटन करण्यात आलेले आहेत. बचत गटांना फिरता निधी दिला आहे
.त्याचप्रमाणे माविम मुख्यालयाच्या मार्गदर्शक सुचनेच्या अधीन राहून सर्व
प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलेले आहेत.
महिला कुटुंब व ग्रामविकास लोकसंचलित साधन
केंद्राच्या अध्यक्ष रेखा दावणे
आभार मानून कार्यक्षेत्र भेट संपली असे जाहीर केला .
0 00 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.