कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा
माहिती कोल्हापूर): जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने 15
ते 35 या वयोगटातील युवक- युवतींसाठी
जिल्हास्तरीय युवा मोहत्सवाचे आयोजन ऑनलाईन किंवा व्हर्च्युअल पद्धतीने
करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर
साखरे यांनी दिली.
यामध्ये लोकनृत्य,
लोकगीत, एकांकिका (इंग्रजी / हिंदी),
शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी किंवा कर्नाटकी ), सितार वादन, बासरी वादन, तबला वादन, विणा वादन, मृदूंग, हार्मोनियम
(लाईट), गिटार , मनिपुरी नृत्य, ऒडिसी नृत्य,
भरतनाट्यम, कथ्थक, कुचिपुडी नृत्य या बाबींच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार
आहे.
विजयी होणारे स्पर्धक हे
विभागस्तर युवा मोहत्सव स्पर्धेसाठी पात्र ठरतील. या स्पर्धा जिल्हा-विभाग-राज्य-राष्ट्रीय या पद्धतीने आयोजित करण्यात येतील.
ज्यांना स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे त्यांनी
23 डिसेंबर पर्यंत आपल्या प्रवेशिका जिल्हा क्रीडा कार्यालयात सायं. 5 वाजेपर्यं जमा
कराव्यात. प्रवेशिकेचा नमुना व इतर माहिती जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या dsokop.blogspot.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.