गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

नृसिंहवाडी येथील दत्तजयंती महोत्सव रद्द जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

 


कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान मंदीरामध्ये दि.29 डिसेंबर रोजी होणारा दत्तजयंती महोत्सव रद्द करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान मंदीरामध्ये दिनांक 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या दत्तजयंती महोत्सवामुळे भाविकांची गर्दी होवून कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान मंदीरामध्ये दिनांक 29 डिसेंबर रोजी होणाऱ्या दत्तजयंती महोत्सव रद्द करण्यात येत आहे.

उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहीता 1860 (45) च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

0  0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.