शनिवार, ५ डिसेंबर, २०२०

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचे आदेश

 


 

कोल्हापूर, दि. 5 (जिल्हा माहिती कार्यालय): कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांचा गळीत हंगाम  सन 2020-21 सुरु झाला आहे. साखर कारखान्यांना जिल्ह्यातुन व इतर ठिकाणाहून  ट्रक, ट्रॅक्टर-ट्रॉली, बैलगाड्या इत्यादी वाहनांच्या मदतीने ऊस वाहतूक सुरु आहे. कोल्हापूर शहरातील वाहनांची रहदारी पाहता शहरातील वाहतुक सुरक्षित व नियंत्रित राहणे आवश्यक आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत

          हे आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 34 अन्वये  दिले असून ऊस वाहतुकीच्या   करणाऱ्या वाहनांना दिनांक 5 डिसेंबर 2020 रोजी पासून गळीत हंगाम संपेपर्यंत  लागू राहतील.  या आदेशाचे पालन ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी करावे, असे पोलीस अधीक्षक  शैलेश बलकवडे, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

          ऊस वाहतुक करणाऱ्या अवजड, जड व मध्यम वाहनांसाठी  खालील पर्यायी व सोयीच्या मार्गाचा वापर करावा.

1)      राजाराम कारखान्याकडे :-

A)     तावडे हॉटेलकडू-ताराराणी पुतळा उजवीकडे वळण, सदर बाजार-धैर्यप्रसाद हॉल चौक-पोलीस अधिक्षक कार्यालय-कसबा बावडा मेन रोड- राजाराम साखर कारखान्याकडे मार्गस्त होतील.

B)      बालींगाकडून –फुलेवाडी-रंकाळ-टॉवर-रंकाळा-स्टँड गंगावेश-डावीकडे वळण-शिवाजी पुल उजवीकडे वळण-सी. पी. आर. सिग्नल चौक-महावीर कॉलेज-कसबा बावडा मेन रोड-राजाराम साखर कारखान्याकडे मार्गस्त होतील.

C)      भोगावती व कळंब्याकडून –पुईखडी-नवीन वाशी नाका उजवे वळण-रिंगरोड-कळंबा संभाजीनगर-रिंगरोड-सायबर चौक-हायवे कॅटिन डावे वळण-उड्डाण पुल- ताराराणी पुतळा- सदरबाजार-धैर्यप्रयाद हॉल पोलीस अधीक्षक कार्यालय-कसबा बावड-राजाराम साखर कारखान्याकडे मार्गस्त होतील

2)      डी. वाय. पाटील कारखाना व कुडित्रे कारखान्याकडे-तावडे हॉटेल कडून- ताराराणी पुतळा उजवीकडे वळण-सदर बाजार धैर्यप्रसाद हॉल-हेडपोस्ट ऑफीस-महावीर कॉलेज-सी.पी.आर सिग्नल उजवे वळण-शिवाजी पुल चौक डावेवळण-गंगावेश उजवे वळण-रंकाळा- स्टॅन्ड-रंकाळा टॉवर-फुलेवाडी-डी.वाय.पाटील कारखाना व कुडित्रे कारखान्याकडे मार्गस्त होतील.

3)      बिद्री कारखान्याकडे-तावडे हॉटेल कडून-ताराराणी पुतळा डावे वळण-उड्डाण पुल हायवे कॅन्टीन चौक-सायबर चौक डावे वळण-रिंगरोड मार्गे संभाजीनगर डावे वळण-कळंबा-बिद्री कारखान्याकडे मार्गस्त होतील.

4)     भोगावती कारखान्याकडे-तावडे हॉटेल कडून ताराराणी पुतळा डाव वळण- उड्डाण पुल-हायव कॅन्टीन चौक-सायबर चौक डाव वळण-रिंगरोड मार्गे संभाजीनगर डावे वळण-कळंबा साईमंदिर उजवे वळण रिंगरोड-नवीन वाशी नाका डावे वळण-भोगावती कारखान्याकडे मार्गस्त होतील.

5)      दत्त दालमिया कारखान्याकडे-तावडे-हॉटेल कडून- महामार्गावरील शिये सर्विस रोड-भुयेवाडी मार्गे दत्त दालमिया कारखान्याकडे मार्गस्त होतील.

6)      फुलेवाडी रंकाळा टॉवर-रंकाळ-स्टँड-गंगावेश डावीकडे वळण-छत्रपती शिवाजी पुल उजवीकडे वळण-सी. पी. आर सिग्नल चौक-महावीर कॉलेज-कसबा बावडा-राजाराम साखर कारखान्याकडे येणारी व जाणारी ऊस वाहतुक रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यत करण्यात यावी. इतर वेळेमध्ये त्यांना प्रतिबंध करण्यात येत आहे.

          दिनांक 5 डिसेंबर 2020 रोजी पासुर श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना व कोल्हापूर जिल्ह्यातील इतर कारखान्यांचा गळीत हंगाम संपेपर्यंत ऊस वाहतुक करणारे ट्रक, ट्रॅक्टर व बैलगाड्या इत्यादी वाहतुक करण्यासंदर्भात हे निर्देश देण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी आदेशात नमूद केले आहे.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.