कोल्हापूर,
दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय): राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता
यांच्या असमान निधी योजनेंतर्गत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या
सर्वांगिण विकासासाठी ग्रंथालय संचालनालय, मुंबई यांच्यामार्फत अर्थसहाय्याच्या
विविध योजना राबविण्यात येतात. इच्छूकांनी कोणत्याही एका योजनेसाठीचा प्रस्ताव
विहित मार्गाने व मुदतीत आवश्यक कागदपत्रांसह इंग्रजी / हिंदी भाषेत चार प्रतीत
संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दिनांक 8 जानेवारी पर्यंत पाठवावा,
असे आवाहन ग्रंथालय संचालक शालिनी इंगोले यांनी केले आहे.
सन
2019-20 साठीच्या असमान निधी योजना पुढीलप्रमाणे आहेत- ग्रंथालय सेवा देणाऱ्या
स्वयंसेवी संस्थांना ग्रंथ, साधन सामग्री, फर्निचर, इमारत बांधकाम व इमारत विस्तार
यासाठी असमान निधीतून अर्थसहाय्य. राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ज्ञान
कोपरा विकसित करण्यासाठी अर्थसहाय्य. महोत्सवी वर्ष जसे 50/60/75/100/125/150 वर्ष
साजरे करण्यासाठी अर्थसहाय्य. राष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्र, कार्यशाळा,
प्रशिक्षण वर्ग व जागरूकता कार्यक्रम आयोजनासाठी अर्थसहाय्य. बाल ग्रंथालयांसाठी
राजा राममोहन रॉय ग्रंथालय बाल कोपरा स्थापन करण्याकरिता अर्थसहाय्य.
या
योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छूकांनी प्रतिष्ठानचे www.rrrif.gov.in हे संकेतस्थळ
पहावे. आवश्यकता असल्यास संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क
साधावा.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.