गुरुवार, १७ डिसेंबर, २०२०

पत्रकात नोंदणीमध्ये अनियमिता, चौकशी पथकाची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 

 

कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : तहसिलदार करवीर मधील कमी जास्त पत्रकाच्या नोंदणीमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत व कार्यालयात आढळून आलेल्या नोंदणी नसलेल्या दस्तऐवजाबाबत सखोल चौकशी करण्यासाठी पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.  

 पथक प्रमुख म्हणून करवीरचे उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची तर सहायक अधिकारी म्हणून करवीर तहसिलदार शीतल मुळे, तहसिलदार (सर्वसाधारण) अर्चना कापसे व नायब तहसिलदार अनंत गुरव यांची नियुक्ती केली आहे. नियुक्ती अधिकाऱ्यांनी संबंधित दोषी अधिकारी/कर्मचारी यांच्या जबाबदारी निश्चित करणे, त्यांच्या विरुध्द विभागीय चौकशी प्रस्तावित करणे व आवश्यक असल्यास बोगस आदेश व कागदपत्रे तयार करणाऱ्या संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा.

       संबंधित अधिकाऱ्यांनी  1. तहसिलदार करवीर यांच्या अहवालात नमुद असलेली        दि. 1 जून 2019 ते 30 जून 2020 या कालावधीतील सर्व कमी जास्त पत्रके तपासणे. 

          2. उप अधीक्षक  भुमी अभिलेख, करवीर यांनी सादर केलेली गावनिहाय 150 कमी जास्त पत्रके तपासणे.

          3. 2 नुसार करवीर तालुक्यातील संबंधित मंडळ अधिकारी यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावामध्ये उप अधीक्षक भुमी अभिलेख, करवीर यांच्याकडील मोजणी करुन तयार करण्यात आलेल्या कमी जास्त पत्रकाची नोंद गाव दप्तरी घेण्यात आली असलेली वरील नमुद 150 - प्रकरणांपैकी 110 प्रकरणे तपासणे, उर्वरित 40 प्रकरणे कोणती आहेत त्यांची सद्यस्थिती व अनियमितता आहे अगर कसे ? हे तपासणे.

4) सदर प्रकरणी अधिकृत गुंठेवारी आदेश प्राप्त आहेतका ? त्यासाठी योग्य कायदेशीर प्रक्रीयेचा अंमल करण्यात आला आहे का?

5) उप अधीक्षक भुमी अभीलेख, करवीर यांच्या कार्यालयात कमी जास्त प्रत्रक तयार करण्या बाबतची वरील प्रकरणातील कार्यालयीन प्रक्रीया व तहसिलदार करवीर यांच्याकडील आदेश तपासणे.

6) संबंधीत तलाठी कार्यालयात सदर क.जा.प.ची नोंद 7/12 पत्रकी करताना योग्य कायदेशीर प्रक्रीया अनुसरली आहे अथवा कसे? हे तपासणे.

7) निवासी नयाब तहसिलदार करवीर व प्रभारी महसूल नायब तहसिलदार करवीर यांच्याकडून सदर क.जा.प नोंदीसाठी करण्यात आलेली कामकाजातील अनियमितता तपासणे.

8) सदर क. जा. प. नोंदीतील नमुद गुंठेवारी आदेश बनावट आहेत अगर कसे? हे तपासणे.

9) तहसिल कार्यालय करवीर मध्ये दरम्यानच्या कालावधीत आढळून आलेल्या परंतु नोंदणी नसलेल्या दस्त ऐवजाची तपासणी करणे.

10) प्रस्तुत प्रकरणात गैर प्रकारात गुंतलेल्या खासगी व्यक्ती विरुध्द/ अशा व्यक्ती बोगस आदेश किंवा कागदपत्रे तयार केल्याचे प्रथम दर्शनी सिध्द होत असल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणे.

          वरील बाबींची व त्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या सर्व बाबीची सखोल चौकशी करुन संबंधीत दोषी अधिकारी/कर्मचारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन त्यांच्या विरुध्द विभागीय चौकशी प्रस्तावीत करावी. तसेच आवश्यक असलेल्या संबंधीत खासगी व्यक्तीविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या आदेशत पासून एका महिन्यात समक्ष सादर करावा, असेही आदेशात नमुद आहे.

 0 00 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.