कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : कृषी
सुधारणा विधेयक 2020 संधी व आव्हाने या विषयावर 1 ऑक्टोबर रोजी google meet वर
अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती
कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे (रामेती), प्राचार्य उमेश पाटील यांनी
दिली.
एक ऑक्टोबर रोजी 11.30 ते
दुपारी 1.30 यावेळेत मार्गदर्शन करणात आहेत. या प्रशिक्षणाचा लाभ कृषि विभागातील अधिकारी/कर्मचा-यांबरोबरच शेतकरी बांधवासाठीही
नि:शुल्क उपलब्ध आहे. विधेयकांचा शेतीमधील उत्पादनापासून ते विक्री व्यवस्थेपर्यंत दुरगामी व बहुआयामी परीणाम होणार आहेत. विधेयकामधील नेमक्या तरतुदी व त्याचा शेती क्षेत्रावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन होणार आहे.
या मार्गदर्शनाचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ घ्यावा. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी आवश्यक link
आपल्या गावातील कृषि सहाय्यक यांचेकडून उपलब्ध करुन घ्यावी.
असे आवाहनही श्री. पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 0231 2950174 संपर्क साधावा.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.