गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्र जिल्ह्यातील 100 अंगणवाडीत पोषण परसबाग विकसित करणार

 


कोल्हापूर, दि. १७ (जिल्हा माहिती कार्यालय)- कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे व इफकोच्या  वतीने पथदर्शी प्रयोग म्हणून १०० अंगणवाडीत पोषणबाग किट वितरीत करून तिथे पोषण परसबाग विकसित करणार असल्याने महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी कौतुक केले.

          डी.वाय. पाटील. एज्युकेशन सोसायटीचे, कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, महिला व बाल विकास, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जिल्हा परिषद, व इफको यांच्या संयुक्त विद्यमाने १७ सप्टेंबर रोजी नारी प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम वाठार ता. हातकणंगले येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन  जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. रसाळ व इसकोचे क्षेत्र अधिकारी विजय भुनगे यांच्या प्रमुख उपस्थित झाला.

          परसबागेच्या या संकल्पनेला प्रोत्साहन म्हणून कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे, व इफको यांच्यामार्फत देशी बियाणाचे पोषणबाग किट उपस्थित अंगणवाडी सेविकांना वाटप करण्यात आले. या पोषण बाग बियाणे किटमध्ये पालेभाज्या फळभाज्या वेलवर्गीय भाज्या मूळ,खोड वर्गीय व फळे देशी बियाणे यांचा समावेश आहे.

          इफकोचे श्री भुनगे, यांनी  या राष्ट्रीय पोषण माह वतीने संपूर्ण देशात इफको व कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सुरू आहे तरी या कार्यक्रमाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.  

          या कार्यक्रम मध्ये मार्गदर्शक म्हणून गृहविज्ञान विभागाचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. सोनल कामे, अकोला येथील  कॉलेज फोर वुमन श्रीमती राधादेवी गोएंका यांनी दैनंदिन जीवनातील आहारामध्ये जैवसंपृक्त पिकाचे महत्व व पोषक थाळी या बद्दल उपस्थितांना आहारामुळे रोगप्रतिकार शक्तीमध्ये कशी वाढ करून घेता येईल व कोरोना सारख्या दुर्धर परिस्थितीमध्ये सुद्धा निरोगी जीवन कसे जगता येईल हे सांगितले.

           र प्रा. दिपाली मस्के यांनी पोषणबाग व्यवस्थापन बद्दल व आज च्या ह्या परिस्तिथी मध्ये दैनंदिन जीवनात विषमुक्त भाजी व फळे भेटावे या उद्देशाने परसबाग गरजेची आहे व प्रा. दीपक पाटील यांनी महत्वाच्या फळे व भाजीपाला लागवड यशस्वी करण्यासाठी माती परीक्षण, अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन यांच्या जोडीला पक्वतेनुसार मालाची काढणी व प्रतवारी करणे गरजेचे याविषयी मार्गदर्शन केले.

          या कार्यक्रमासाठी  ऑनलाइन झूम ॲप व यूट्यूब च्या साह्याने २४५ महिला शेतकरी व पुरुष शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. प्रस्तावना, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ जयवंत जगताप यांनी  केले व सूत्रसंचालन व आभार राजवर्धन सावंत भोसले यांनी मानले केले. यावेळी प्रकल्प अधिकारी पद्मश्री कुंभार, पर्यवेक्षिका पाथरवट, वाठार गावातील आंगणवाडी सेविका उपस्थित होत्या,

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.