शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या तक्रारींसाठी १८००१०२१०८० वर संपर्क साधा सक्तीच्या वसुलीविरुद्ध कारवाई -पालकमंत्री सतेज पाटील

 


कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय) : मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुलीबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. ग्राहकांकडून सक्तीने वसुली करत असल्याच्या तक्रारीविरुद्ध कारवाई केली जाईल, असा इशारा देतानाच, ग्राहकांनी अशा कंपन्यांच्या तक्रारींसाठी १८००१०२१०८० वर संपर्क साधावा, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.

            सध्याच्या कोव्हीड -१९ महामारीच्या अनुषंगाने केंद्रशासन आणि राज्य शासनाकडून वेळोवेळी लॉकडाऊन करण्यात आले आहे. शासनाकडून मदतीच्या उपाय योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. 

            मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीबाबत काही ग्राहकांच्या तक्रारी आढळून येत आहेत. तर काही ग्राहकांना अशा मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या व्याज दर, विविध शुल्क व दंड  तसेच अन्य तक्रारी असतील तर त्यांनी १८००१०२१०८० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. ही सुविधा मराठी भाषेत असल्याने ग्राहकांनी यावर तक्रारी दाखल कराव्यात, असे पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले.

            मायक्रो फायनान्स कंपन्यांनी वसुली बाबतीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दिशा निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. जर कंपन्यांनी ग्राहकांकडून सक्तीने वसुली करत असल्याचे निदर्शनास आल्यास, अशा तक्रारीविरोधात योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला आहे.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.