कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती
कार्यालय) : निवृत्ती वेतनधारकांना हयातीचे दाखले 30 डिसेंबरपर्यंत सादर करण्यासाठी
विहित नमुन्यातील याद्या निवृत्तीवेतनधारक ज्या बँकेतून निवृत्तीवेतन/कुटुंब
निवृत्तीवेतन घेत आहेत, त्या बँकेकडे पाठविण्यात आल्या आहेत. या याद्यावर निवृत्ती
वेतनधारकाने आपल्या नावासमोरच स्वाक्षरी करावी. जे निवृत्ती वेतनधारक 30 डिसेंबरपर्यंत स्वाक्षरी करणार
नाहीत, त्यांचे जानेवारी 2021 चे निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार नाही, असे
कोषागार अधिकारी महेश कारंडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.