मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२०

खेलो इंडिया योजनेंतर्गत क्रीडा संघटनांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

कोल्हापूर, दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय) : खेलो इंडिया योजनेंतर्गत देशातील विविध जिल्ह्यामध्ये 1 हजार खेलो इंडिया सेंटर निर्माण करावयाचे आहेत. यासाठी इच्छुक क्रीडा संघटनांनी आपले प्रस्ताव http://nsrs.kheloindia.gov.in या संकेतस्थळावर सादर करावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी केले आहे.

  यामध्ये  अ‍ॅथलेटिक्स, आर्चरी, बॉक्सिंग,  बॅडमिंटन,  सायकलिंग, तलवारबाजी, हॉकी,  ज्युदो, रोईंग,  शुटींग, जलतरण, टेबल टेनिस,  वेटलिफ्टींग,  कुस्ती,  फूटबॉल व देशी खेळ  या खेळांच्या सेंटरचा समावेश असणार आहे.

नोंदणीकृत जिल्हा क्रीडा संघटना कमीत कमी ५ वर्षे पासून त्या खेळात कार्यरत असणे आवश्यक आहे. संघटनेच्या प्रशिक्षण केंद्रावर सराव करणारे आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय स्तरावरील कमीत कमी १५ मुले व १५ मुली असे एकूण ३०  खेळाडू आवश्यक आहेत. प्रशिक्षण केंद्रावर सराव करण्यासाठी खेळाडूंसाठी आवश्यक मैदान, प्रशिक्षण साहित्य, निवास व्यवस्था व आवश्यक असणा-या सोयी- सुविधा संघटनाकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे.  प्रशिक्षण केंद्रासाठी पात्रता धारक प्रशिक्षक आवश्यक आहेत. या बाबी पूर्ण करणाऱ्या जिल्हा क्रीडा संघटनाच यासाठी प्रस्ताव सादर करू शकतात.

अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधावा.

000000

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.