सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

निवृत्ती वेतनधारकांनी आपली माहिती पोस्ट, ईमेलद्वारे पाठवावी जिल्हा कोषागार अधिकारी महेश कारंडे यांचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 28  (जिल्हा माहिती कार्यालय) :- निवृत्ती वेतनधारकाकडून निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यासाठी मागविण्यात आलेली माहिती कोषागार कार्यालयास सादर करण्यास कोणतीही कालमर्यादा नसल्याने कार्यालयात गर्दी न करता माहिती पोस्टाद्वारे अथवा to.kolhapur@zillamahakosh.in या ईमेलवर पाठवावी, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी महेश कारंडे यांनी केले आहे.

            राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांची माहिती निवृत्तीवेतन प्रणालीमध्ये अद्ययावत करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाकडून  संबंधिताकडून माहिती मागणी करण्यात आली आहे. ही माहिती सादर करण्यासाठी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत कोणतीही कालमर्यादा नसल्याने निवृत्ती वेतनधारकांनी माहिती सादर करण्यासाठी कोषागार कार्यालयात गर्दी करु नये. सध्या कोरोना साथरोगाचा प्रादुर्भाव असल्याने निवृत्ती वेतनधारकांनी आपली माहिती पोस्टाद्वारे अथवा to.kolhapur@zillamahakosh.in या ईमेलवर पाठवावी, असे आवाहनही कोषागार अधिकारी श्री. कारंडे यांनी केले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.