शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

माझे कुटुंब माझी जबाबदारी तिसऱ्यादिवशी 357625 नागरीकांचे सर्व्हेक्षण - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे

 


कोल्हापूर, दि. 19 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत  कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या तिसऱ्यादिवशी 80780 घरांचे आणि 357625 इतक्या लोकांची  सर्व्हेक्षण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

           ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत तिसऱ्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती आजरा-2830 घरांचे  व 10944 नागरिकांचे. भुदरगड 5207 घरांचे  व 21250  नागरिकांचे, चंदगड 4348 घरांचे व 20311 नागरिकांचे, गडहिंग्लज 6425 घरांचे व 25684 नागरिकांचे, गगनबावडा 1306 घरांचे व 6736 नागरिकांचे, हातकणंगले 9272 घरांचे व 44929  नागरिकांचे, करवीर 9380 घरांचे व 41835 नागरिकांचे, कागल 5181 घरांचे व 18012 नागरिकांचे,  पन्हाळा 4596 घरांचे व 21799 नागरिकांचे, राधानगरी 4134 घरांचे व 20031  नागरिकांचे, शाहूवाडी 4614 घरांचे व 18062 नागरिकांचे, तर शिरोळ- 5660 घरांचे व 25288 नागरिकांचे असे एकूण  6293 घरांचे व 274881 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

          नगरपंचायत हातकणंगले 347 घरांचे व 1717 नागरिकांचे, नगरपंचायत इचलकरंजी 5103 घरांचे  व 25742 नागरिकांचे, नगरपंचायत पेठवडगाव 720 घरांचे व 3583 नागरिकांचे, नगरपंचायत हुपरी 690 घरांचे व 3054 नागरिकांचे,  नगरपंचायत मुरगुड 113 घरांचे व 441 नागरिकांचे तर नगरपंचायत पन्हाळा 86 घरांचे व 340 नागरिकांचे,  नगरपंचायत जयसिंगपूर 876 घरांचे व 3769 नागरिकांचे, असे एकूण 7935 घरांचे व 38646 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तर कोल्हापूर शहरातील  9892 घरांचे तर 44098 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.