बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०

माझे कुटुंब माझी जबाबदारी आज 341169 नागरीकांचे सर्व्हेक्षण - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे

 


कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत  कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या आजच्यादिवशी 78323 घरांचे आणि 341169 इतक्या लोकांची  सर्व्हेक्षण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

             ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत आजच्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती आजरा-2831 घरांचे  व 10997 नागरिकांचे. भुदरगड 2033 घरांचे  व 7939  नागरिकांचे, चंदगड 3860 घरांचे व 15934 नागरिकांचे, गडहिंग्लज 2048 घरांचे व 4853 नागरिकांचे, गगनबावडा 845 घरांचे व 4340 नागरिकांचे, हातकणंगले 8982 घरांचे व 41839 नागरिकांचे, करवीर 9411 घरांचे व 43196 नागरिकांचे, कागल 4931 घरांचे व 21130 नागरिकांचे,  पन्हाळा 4534 घरांचे व 22175 नागरिकांचे, राधानगरी 3615 घरांचे व 15852  नागरिकांचे, शाहूवाडी 4013 घरांचे व 17114 नागरिकांचे, तर शिरोळ- 5234 घरांचे व 24207 नागरिकांचे असे एकूण  52377 घरांचे व 229576 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

            नगरपंचायत आजरा 1412 घरांचे व 6051 नागरिकांचे, नगरपंचायत चंदगड 950 घरांचे व 3776 नागरिकांचे, नगरपंचायत गडहिंग्लज 4626 घरांचे व 17693 नागरिकांचे, नगरपंचायत हातकणंगले 350 घरांचे व 1375 नागरिकांचे, नगरपंचायत इचलकरंजी 5012 घरांचे  व 23058 नागरिकांचे, नगरपंचायत   पेठवडगाव 590 घरांचे व 2469 नागरिकांचे, नगरपंचायत हुपरी 626 घरांचे व 2569 नागरिकांचे, नगरपंचायत कागल 655 घरांचे व 2909 नागरिकांचे,  नगरपंचायत मुरगुड 158 घरांचे व 772 नागरिकांचे, नगरपंचायत पन्हाळा 68 घरांचे व 301 नागरिकांचे, नगरपंचायत मलकापूर घरांचे 480 व  2191 नागरिकांचे, नगरपंचायत शिरोळ 321 घरांचे व 1576 नागरिकांचे, नगरपंचायत कुरुंदवाड 872 घरांचे व 3841 नागरिकांचे तर नगरपंचायत जयसिंगपूर 1280 घरांचे व 5376 नागरिकांचे, असे एकूण 17400 घरांचे व 73957 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तर कोल्हापूर शहरातील  8586 घरांचे तर 37636 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.