कोल्हापूर,
दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : शेतकऱ्यांनी नाविण्यपूर्ण औजारे / उपकरणांच्या
नोंदणीसाठी कृषी विभागाच्या कृषी
सहाय्यकांशी किंवा प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेशी संपर्क
साधावा, असे आवाहन कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे (रामेती),
प्राचार्य उमेश पाटील यांनी केले आहे.
औजारे/उपकरणांना प्रसिध्दी मिळण्यासाठी व आवश्यकतेनुसार पेटेंट/अधिकृत मान्यता करुन घेण्याच्या दृष्टीने नाविण्यपूर्ण कृषि औजारे/उपकरणे यांचे जिल्हानिहाय प्रदर्शन भरविण्याची कृषी
मंत्र्यांची संकल्पना आहे. या अनुषंगाने ग्रामस्तरावर नाविण्यपूर्ण औजारे/उपकरणे तयार करणा-या शेतकरी बांधवांच्या उत्पादनांना मदत करण्यासाठी त्यांची माहिती राज्यस्तरावर संकलित करणेचे काम सुरु असून शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क
साधावा.
शाश्वत शेती करण्याच्या उद्देशाने वेळोवेळी तंत्रशुध्द शेती पुरक औजारांची गरज पडते. शेतमजुरांची उपलब्धता ही मोठी समस्या सद्या निर्माण झाली आहे. यांत्रिक पध्दतीने शेती करणे अनिवार्य होत चालले आहे. कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्हयामध्ये शेतीपूरक औजारे तयार करणारे तज्ञ व्यक्ति, संस्था व कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी विभागाचे शास्त्रज्ञ काम करीत आहेत. यांच्या व्यतिरिक्त ग्रामस्तरावर विविध कृषि औजारे निर्माते आहेत. शेतक-यांच्या गरजेनुसार व उपलब्ध भौगोलिक परिस्थितीला अनुसरुन/जुगाड तंत्र वापरुन नवनवीन औजारे/उपकरणांची निर्मिती करीत आहेत. परंतू त्यांनी तयार केलेल्या औजारे/उपकरणांना पेटेंटची जोड/ अधिकृत मान्यता नसल्याने ते प्रचलित होत नाहीत. व त्या तंत्रज्ञानाचा इतरांना फायदा होत नाही.
अधिक
माहितीसाठी
दूरध्वनी क्र.: 02312950174 Email ID : rametiklp@rediffmail.com येथे संपर्क साधावा,
असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.