कोल्हापूर, दि.
17 (जिल्हा माहिती कार्यालय) : शासकीय आयटीआय येथे ऑनलाईन प्रवेश
प्रक्रियेमध्ये दुसऱ्या प्रवेश फेरीपूर्वी अर्ज Edit करण्यची सुविधा उपलब्ध करुन
देण्यात आली असल्याचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यानी कळविले आहे.
पहिल्या प्रवेश फेरीमध्ये पालक व
उमेदवारांना माहिती नसल्यामुळे अर्जामध्ये अनावधानाने झालेल्या चुकीमुळे बहुतांश
उमेदवार प्रवेशापासून वंचित झालेले निर्दशनास आलेले आहे. चुकांची दुरुस्ती
करण्यासाठी ऑनलाईन अर्ज Edit करण्याची सुविधा दुस-या फेरी यादी उपलब्ध करुन देण्यात
आली आहे. ऑनलाईन दुसरी फेरी सद्यस्थितीत
स्थगित ठेवण्यात आलेली आहे.
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (
आय.टी.आय.) कळंबा रोड, येथे दिनांक 1 ऑगस्ट पासून सुरु झालेली पहिली प्रवेश फेरी दि 9 ते 16 सप्टेंबर या कालावधीत
घेण्यात आलेली आहे.
पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार
दुसरी फेरी दि 18 सप्टेंबर पासून आयोजित करण्यात आलेली होती. मा.सर्वाच्च
न्यायालयाच्या निर्णयानुसार सामाजिक
व शैक्षणिक दृष्टया
मागास (SEBC) प्रवर्गाच्या सामाजिक
आरक्षणास स्थगिती देण्यात आलेली आहे व या अनुषंगाने प्रवेश प्रक्रियेतील आरक्षणामध्ये बदल
करण्यासंर्दभात शासनाकडून आदेश प्राप्त
झाला नसल्याने SEBC आरक्षणाबाबत शासनाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर उमेदवांराना
त्यांच्या प्रवेश अर्जात नमूद केलेल्या माहितीमध्ये बदल करण्याची सुविधा उपलब्ध
करुन देणे आवश्यक आहे.
पहिल्या फेरीमधील प्रवेशित
उमेदवारांच्या व्यतिरिक्त सर्व उमेदवारांना त्यांच्या प्रवेश अर्जातील माहितीमध्ये
बदल करण्यासाठी व पुढील प्रवेश फेरीसाठी विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी दिनांक 17-ते 20 सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी 05.00 वाजेपर्यत
सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. त्यासाठी उमेदवाराने त्यांच्या प्रवेश
खात्यात प्रवेश करुन (Login)Admission Activity-ÞGrievance Redressal/Edit Application Form येथे
Click करावे . याबाबत अधिक माहिती आवश्यक
असल्यास औ.प्र.संस्था, कळंबा रोड, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.
शासनाच्या आदेशानुसार प्रवेश प्रक्रियेमध्ये भविष्यात होणारे बदल व सुधारणा , सुधारित
वेळापत्रक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असेही त्यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.