कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती
कार्यालय) : कोव्हिड-19 च्या प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाय योजनांतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत विविध प्रकारची साधनसामग्री, साहित्य, औषधे इ. खरेदी करुन सर्व शासकीय आरोग्य संस्था, शासकीय कार्यालये, अन्य सहयोगी आरोग्य विषयक संस्था यांना जिल्हा परिषदेमार्फत पुरवण्यात येत आहे. सर्व संबधित संस्थांनी आवश्यक नियोजन करुन त्यांच्याकडील कोव्हिड-19 प्रतिबंध व उपचारासाठी आवश्यक साहित्य, साधनसामग्री, औषधे इ. उपलब्ध करुन घेणे, साठा आवश्यक इतका पुरेसा राहील यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. दि. 5 ऑक्टोबर नंतर जिल्हा परिषद अधिनस्त आरोग्य संस्था व जिल्हा परिषदकडील शासकीय यंत्रणा वगळता अन्य संस्थाना Covid 19 प्रतिबंध/ उपचारात्मक साहित्य/ साधनसामग्री/ उपकरणे इ. उपलब्ध करून दिली जाणार नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल
यांनी कळविले आहे.
गेल्या
सहा महिन्यांच्या
कालावधीमध्ये
Covid
19 प्रतिबंध
व उपचाराकरिता
आवश्यक
साठा उपलब्धते
संदर्भात योग्य नियोजन
केले असेल याबाबत
खात्री आहे.
नियोजन अद्याप
केले नसल्यास
येत्या
15 दिवसांमध्ये
दि. 30
सप्टेंबर पर्यंत
साठा उपलब्धते
संदर्भात आवश्यक
कार्यवाही
करावी
व आपले
अधिनस्त आरोग्य
संस्थेत
दाखल होणारे
रुग्ण/
आपल्या
अधिनस्त
कर्मचारी
यांना
आवश्यक
साठा उपलब्ध
होईल याची दक्षता
घ्यावी.
याबाबत
महानगरपालिका
आयुक्त, पोलिस अधिक्षक,
राजर्षी
छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता,
जिल्हा शल्यचिकित्सक,
सर्व
मुख्याधिकारी नगरपरिषद/नगरपालिका यांना आरोग्य
विभागाकडील दि. 18 सप्टेंबर नुसार कळविण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.