शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

अलमट्टीतून 16922 क्युसेक विसर्ग सुरू

 

                कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 233.78 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी  धरणाच्या विद्युत विमोचकातून 250 तर अलमट्टी धरणातून 16922 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, चिकोत्रा मध्यम प्रकल्प, दूधगंगा मोठा प्रकल्प व कुंभी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा 1 बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात 104.61 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 97.82 दलघमी, वारणा 970.13 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 78.57 दलघमी, कडवी 68.43 दलघमी, कुंभी 76.83 दलघमी, पाटगाव 105.24 दलघमी, चिकोत्रा 43.12 दलघमी, चित्री 53.41 दलघमी, जंगमहट्टी 34.650 दलघमी, घटप्रभा  43.206  दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.060 दलघमी असा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 13.8, सुर्वे 15.2 फूट, रुई 41.9 फूट, इचलकरंजी 38 फूट, तेरवाड 37 फूट, शिरोळ 29.6 फूट, नृसिंहवाडी 26.6 फूट, राजापूर 16.3 फूट तर नजीकच्या सांगली 8.9 फूट व अंकली 9.2  फूट अशी आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.