शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

ह्दया कोव्हिड रूग्णालयाचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

 

   




           

कोल्हापूर, दि. 18 :  प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील हृदया कॅन्सर सेंटरमध्ये कोव्हिड रूग्णालय सुरू करण्यात आले. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते फित कापून आज उद्घाटन करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी यावेळी धन्वंतरीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. यानंतर त्यांनी रूग्णालयाची पाहणी केली. या रूग्णालयामुळे परिसरातील कोव्हिड बाधित रूग्णांच्यावर उपचार करण्यासाठी सोय झाली आहे, असे सांगून उपस्थित डॉक्टर्स आणि कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसिलदार प्रदिप उबाळे, महिला व बालकल्याण सभापती पद्माराणी पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे, सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच राहूल शेटे आदी उपस्थित होते.

डॉ. सुरेखा चौगुले यांनी रूग्णालयाची माहिती दिली. रूग्णालयामध्ये एकूण 40 खाटांची सोय असून यापैकी 20 ऑक्सिजनेटेड खाटा आहेत. 7 आयसीयू खाटांची सोय आहे. 2 व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध असून नजिकच्या काळात आणखी 10 खाटांची सुविधा करण्यात येत असल्याचे सांगितले. डॉ. स्वप्निल कणिरे, डॉ. दयानिधी जयस्वारा, डॉ. सुनील पाटील, डॉ. श्रीनाथ कुलकर्णी उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.