गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

सेवायोजन कार्डशी आधार क्रमांक लिंक करावा - सहायक आयुक्त सं.कृ.माळी

 


कोल्हापूर, दि. 17  (जिल्हा माहिती कार्यालय) :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या महास्वयंम पोर्टलवर नोंदणी (Employment card) केलेले आहे.  आधार कार्ड नंबर व ईमेल, मोबाईल नंबर लिंक केलेला नाही, अशा उमेदवारांनी सदर नोंदणी (Employment card) मध्ये आधारकार्ड नंबर, ईमेल, मोबाईल नंबर लिंक करावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सं.कृ.माळी यांनी केले आहे.

 ज्या उमेदवारांनी नोंदणी आधारकार्डशी लिंक केलेली नाही अशा उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या https://rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर माहिती भरावी.  अन्यथा सेवायोजन कार्ड 30 सप्टेंबर  अखेर रद्द होईल. सेवायोजन कार्डशी आधार लिंक करताना काही अडचण आल्यास दूरध्वनी क्रमांक 0231-2545677 वर संपर्क साधावा.

नवीन नाव नोंदणीसाठी पाथ

https: //rojgar.mahaswayam.gov.inHome Page → Employment → Job Seeker →Register

 

आधार कार्ड लिंक करण्याचा पाथ

https: //rojgar.mahaswayam.gov.inHome Page → Employment → Job Seeker → User ID → Password →Login →Adhar Number →Captcha

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.