कोल्हापूर,
दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : आयकर कायद्यामध्ये झालेल्या बदलानुसार निवृत्ती
वेतनधारकांनी त्यांच्या आयकर कपातीसाठी निवडलेल्या पर्यायाची माहिती कोषागार
कार्यालयास 30 ऑक्टोबर पूर्वी कळवावी, असे आवाहन कोषागार अधिकारी महेश कारंडे
केंद्र शासनाने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये आयकर कायद्यामध्ये बदल
केलेला आहे. आयकर वसुली नवीन Section 115 BAC नुसार 2020-21 च्या आयकर गणनेसाठी
New Tax Regime आणि Old Tax Regime असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. याबाबतची
सविस्तर माहिती कोषागार कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे.
निवृत्ती वेतनधारकांनी आयकर गणनेसाठी New
Tax Regime आणि Old Tax Regime या दोन
पर्यायापैकी एका पर्यायाची निवड करण्यासाठी आपल्या सनदी लेखापालाची मदत घ्यावी.
आयकर कपातीसाठी निवडलेल्या पर्याय व गुंतवणुकीची छायांकित प्रत to.kolhapur@zillamahakosh.in या
ईमेल आयडीवर किंवा कोषागार कार्यालय येथे आपले नाव, बँक, ब्रँचसहीत सादर करावी.
जेणेकरुन आपण निवडलेल्या Tax Regime नुसार देय होणारी TDS वसुली करता येईल.
जे निवृत्ती वेतनधारक Tax Regime ची निवड
वेळेत कळवणार नाहीत त्यांची पूर्वीप्रमाणेच
Old Tax Regime मध्ये TDS वजाती केली जाईल, याची निवृत्ती वेतनधारकांनी
नोंद घ्यावी. आयकर वजातीसाठी आपला पर्याय कोषागारास विहित मुदतीत कळवावा, असे
आवाहनही श्री. कारंडे यांनी केले आहे.
0 0 00
0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.