कोल्हापूर, दि. १७ (जिल्हा माहिती
कार्यालय)- माझे कुटुंब - माझी जबाबदारी" मोहीम वैयक्तिक,
कौटुंबिक, सामाजिक ( गाव, सोसायटी, वसाहती), खरेदी साठी जाताना ( दुकाने, मॉल),
शासकीय व खासगी कार्यालये. खासगी व सार्वजनिक प्रवास या स्तरावर घ्यावयाची
प्रतिबंधात्मक उपायायोजना विषयक जणीव जागृती करणं अत्यंत आवश्यक आहे. प्रशासकीय
पातळीवर मोहीम कालावधी, मोहीमेचा उद्देश, गृहभेटीव्दारा आरोग्य सर्वेक्षण,मोहीमेदरम्यान
द्यावयाचे संदेश या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी. यामध्ये समाजाचा सहभाग
असल्यास सदर मोहीम यशस्वी होवून कोव्हिड मुक्त महाराष्ट्र होणे सहज शक्य आहे.
" माझे कुटुंब- माझी जबाबदारी " या मोहीमेमध्ये सक्रिय सहभाग घेवून आपआपल्या
कार्यक्षेत्रामध्ये ही मोहीम राबवावी, असे पत्र राजकीय पक्ष व संघटनांच्या जिल्हा
व तालुका अध्यक्ष, सामाजिक व स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्ष व सचिवांना
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पाठविले आहे.
कोव्हिड
-19 रुग्णांमध्ये मृत्युमध्ये लक्षणीयरित्या भर पडत आहे. कोव्हिड-19 नियंत्रण कार्यवाही
जनतेच्या सहभागातून आवश्यक आहे. राज्य भर " माझे कुटुंब - माझी जबाबदारी
" ही मोहीम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. " माझं कुटुंब - माझी
जबाबदारी " मोहीमेअंतर्गत राज्यातील शहर / गाव / पाडे-वस्त्या/ तांडे यातील
नागरीकास व्यक्तीशः भेटून आरोग्य शिक्षण द्यावयाचे आहे. ही मोहीम दिनांक 15
सप्टेंबर ते 25 ऑक्टोंबर 2020 या कालावधीमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे.
माझे
कुटुंब - माझी जबाबदारी" मोहीम जिल्हयामध्ये प्रभाविपणे राबविण्यासाठी
जिल्हयातील सर्व नागरिकासह, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक व
स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागाने कोव्हिड -19 नियंत्रणासाठी आदर्श व आरोग्यदायी
जीवनशैली पध्दतीचा अवलंब करण्यास अधिक- अधिक नागरिकांना प्रेरित करावे
त्याअनुषंगाने कोव्हीड नियंत्रण प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून कोव्हिड मुक्त
जिल्हा करून कोव्हिड -19 आजार नियंत्रित
करणे हा या मोहीमेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी पत्रात नमुद केले आहे.
1. राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक व स्वयंसेवी संस्था यांचे स्वयंसेवक
प्रत्येक गावागावांत तयार करून सदर
मोहीमेची प्रचार व प्रसिध्दी करावी व गृहभेटी सर्वक्षणकामी स्वयंसेवक
उपलब्ध करून देणे व स्वयंस्फुर्तीने सर्वेक्षण विषयक बाबीमध्ये सहभाग घेण्यात
यावा.
2. वैयक्तिक आरोग्य व सामाजिक अंतर ठेवणे, गावातील सार्वजनिक स्थळे.
दुकाने, विविध आस्थापना, शासकीय कार्यालये या ठिकाणी सामाजिक अंतर राखणे, मास्क,
सॅनिटायझर वापर करणं याबाबी विषयक जाणीव जागृती करावी.
3. गृहभेटीव्दारे कोरोना सदृष्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांच्या तपासणीसाठी
नियुक्त प्रशासनातील आरोग्य
पथकासोबत कोव्हीड दुत ( स्वयंसेवक) उपलब्ध करून द्यावा
4. शहरी व ग्रामीण भागातील प्रशासकीय यंत्रणा, आरोग्य विभाग यांचे
सहकार्याने कोव्हीड संशयित (High Risk) व्यक्ती शोधण्यासाठी Contact Tracing साठी
मदत करावी.
5. राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक व स्वयंसेवी संस्था यांनी ज्या ठिकाणी +ve
रुग्ण व संशयित व्यक्ती जास्त प्रमाणात आहेत त्यांच्यासाठी विलगीकरण कक्ष स्थापित
करावेत व त्याचे व्यवस्थापन आपल्यामार्फत करण्यात यावे किंवा प्रशासनामार्फत
आस्थापित केंद्रामध्ये सहयोग द्यावा.
6. मोहिमेच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी पोस्टर्स, बॅनर्स, SMS, Short Film
Documentry इत्यादी माध्यमांचा वापर करण्यात यावा.
ही
मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेला नागरिकांचे सहकार्य असणे
अत्यंत
आवश्यक आहे व त्यामाध्यमातून " माझे कुटुंब – माझी जबाबदारी " ही
मोहिम यशस्वीपणे राबवून कोव्हीड मुक्त जिल्हा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवता येईल,
असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.