गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

माझे कुटुंब माझी जबाबदारी आज 320452 नागरीकांचे सर्व्हेक्षण - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे

 


कोल्हापूर, दि. 24 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत  कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या आजच्यादिवशी 71961 घरांचे आणि 320452 इतक्या लोकांची  सर्व्हेक्षण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

           ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत आजच्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती आजरा-1999 घरांचे  व 8025 नागरिकांचे. भुदरगड 1029 घरांचे  व 4114 नागरिकांचे, चंदगड 3183 घरांचे व 16463 नागरिकांचे, गडहिंग्लज 1274 घरांचे व 4548 नागरिकांचे, गगनबावडा 327 घरांचे व 1736 नागरिकांचे, हातकणंगले 8928 घरांचे व 41838 नागरिकांचे, करवीर 11239 घरांचे व 51559 नागरिकांचे, कागल 4065 घरांचे व 17484 नागरिकांचे,  पन्हाळा 4333 घरांचे व 20069 नागरिकांचे, राधानगरी 3588 घरांचे व 16349 नागरिकांचे, शाहूवाडी 3908 घरांचे व 26456 नागरिकांचे, तर शिरोळ- 6056 घरांचे व 28698 नागरिकांचे असे एकूण 49929 घरांचे व 237339 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

          नगरपंचायत आजरा 761 घरांचे व 3817 नागरिकांचे, नगरपंचायत चंदगड 602 घरांचे व 2221 नागरिकांचे, नगरपंचायत गडहिंग्लज 345 घरांचे व 1116 नागरिकांचे, नगरपंचायत हातकणंगले 284 घरांचे व 1436 नागरिकांचे, नगरपंचायत इचलकरंजी 4525 घरांचे  व 22260 नागरिकांचे, नगरपंचायत पेठवडगाव 425 घरांचे व 1728 नागरिकांचे, नगरपंचायत कागल 567 घरांचे व 2497 नागरिकांचे, नगरपंचायत मुरगुड 175 घरांचे व 743 नागरिकांचे, नगरपंचायत पन्हाळा 40 घरांचे व 205 नागरिकांचे, नगरपंचायत मलकापूर घरांचे 99 व  438 नागरिकांचे, नगरपंचायत शिरोळ 299 घरांचे व 1378 नागरिकांचे, नगरपंचायत कुरुंदवाड 782 घरांचे व 3025 नागरिकांचे तर नगरपंचायत जयसिंगपूर 992 घरांचे व 4225 नागरिकांचे, असे एकूण 9896 घरांचे व 45089 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तर कोल्हापूर शहरातील 12136 घरांचे तर 38024 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

00000

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.