कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय) : कामगारांची होणारी पिळवणूक पाहून अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांच्या चळवळीचा लढा सुरू केला. त्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, लोकनेते बाळासाहेब देसाई, नरेंद्रजी तिडके, शरद पवार आदी नेत्यांकडे पाठपुरावा करून माथाडी कायदा अंमलात आणला. त्यानंतर त्यांची माथाडी संघटना एक बलाढय़ संघटना म्हणून अस्तित्वात आली असल्याचे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी केले.
अण्णासाहेब पाटील यांच्या ८७ व्या जयंती निमित्त अण्णासाहेब पाटील
आर्थिक मागास विकास महामंडळ कार्यालयात फोटो पूजन करून अभिवादन केले त्यावेळी ते
बोलत होते. यावेळी जिल्हा कौशल्य सहाय्यक आयुक्त संजय माळी, सुजीत चव्हाण, सतीश माने, ऋषिकेश आंग्रे,
पुष्पक पालव, अभिजित बुकशेट, प्रथमेश नेसरीकर, बापू कोळेकर आदी उपस्थित होते.
उपाध्यक्ष श्री. पाटील
म्हणाले, अण्णासाहेबांच्या निधनानंतर शरद पवार यांनी ख-या अर्थाने या चळवळीला मोठा
धीर दिला. अण्णासाहेब पाटील यांच्या पश्चात त्यांचे स्वर्गीय सुपुत्र
शिवाजीराव पाटील यांनी तर पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून माथाडी कामगारांच्या
हितासाठी अनेक सोयी-सुविधा शासनाकडे मागून पदरी पाडून घेतल्या आहेत. कोपरखैरणे
येथील हॉस्पिटल, नवी मुंबईतील सिडकोची घरे, माथाडी भवन आदी प्रकल्प राबविण्यासाठी
त्यांनी रात्रं-दिवस कष्ट उपसले आहेत.
अण्णासाहेब पाटील यांनी माथाडींची अभेद्य अशी चळवळ उभी केली, त्यांनी घालून
दिलेल्या ध्येय-धोरण व शिकवणीनुसार जोमाने व उत्साहाने संघटनेचे कार्य चालू आहे.
माथाडी संघटना, माथाडी पतपेढी, ग्राहक सोसायटी, माथाडी हॉस्पिटल या संस्था अत्यंत
कार्यक्षमपणे यशस्वीरित्या कामगारांना न्याय व फायदे मिळवून देत आहेत.
0 0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.