गुरुवार, १७ सप्टेंबर, २०२०

माझे कुटुंब माझी जबाबदारी तिसऱ्यादिवशी 395013 नागरीकांचे सर्व्हेक्षण - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे

 


कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत  कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या तिसऱ्यादिवशी 90633 घरांचे आणि 395013 इतक्या लोकांची  सर्व्हेक्षण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

           ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत तिसऱ्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती आजरा-2354 घरांचे  व 9707 नागरिकांचे. भुदरगड 6611 घरांचे  व 26109  नागरिकांचे, चंदगड 7488 घरांचे व 35911 नागरिकांचे, गडहिंग्लज 7614 घरांचे व 31878 नागरिकांचे, गगनबावडा 1082 घरांचे व 5469 नागरिकांचे, हातकणंगले 8544 घरांचे व 40505  नागरिकांचे, करवीर 12374 घरांचे व 57790 नागरिकांचे, कागल 9106 घरांचे व 38298 नागरिकांचे,  पन्हाळा 3236  घरांचे व 15240 नागरिकांचे, राधानगरी 4691 घरांचे व 18606  नागरिकांचे, शाहूवाडी 6135 घरांचे व 25827 नागरिकांचे, तर शिरोळ- 2723 घरांचे व 21243 नागरिकांचे असे एकूण  73358 घरांचे व 326583 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

          नगरपंचायत हातकणंगले 330 घरांचे व 1552 नागरिकांचे, नगरपंचायत इचलकरंजी 5575 घरांचे  व 26179 नागरिकांचे, नगरपंचायत पेठवडगाव 1360 घरांचे व 3550 नागरिकांचे, नगरपंचायत कागल 647 घरांचे व 2818 नागरिकांचे, नगरपंचायत मुरगुड 16 घरांचे व 54 नागरिकांचे तर नगरपंचायत पन्हाळा 60 घरांचे व 233 नागरिकांचे, असे एकूण 7988 घरांचे व 34386 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. तर कोल्हापूर शहरातील  9287 घरांचे तर 34044 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.