कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) :
जिल्ह्यातील रुग्णालयांची ऑक्सीजनची गरज पूर्ण करण्यासाठी आणि काही प्रमाणात
उद्योगांनाही पुरवठा करण्यासाठी पुणे येथून ऑक्सीजन मागवावेत. त्यासाठी दोन टँकर
भाड्याने घ्यावेत. तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे तात्काळ पाठवावा, अशी सूचना
पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी
कार्यालयात आज पालकमंत्री श्री. पाटील यांनी ऑक्सीजन उत्पादक, पुरठादार आणि
उद्योजकांसोबत बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ.
मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
पालकमंत्री
श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यातील ऑक्सीजन उत्पादक आणि पुवरठादार यांनी वैद्यकीय
कारणासाठी ऑक्सीजन सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. त्यासाठी जिल्ह्याची एकूण
मागणी पुरवण्यासाठी वाढीव उत्पादन तसेच पुरवठा वाढवावा. उद्योजक असोसिएशननी
एकत्रपणे बैठक घेवून उद्योगांना लागणाऱ्या ऑक्सीजनची गरज पूर्ण करण्यासाठी एखादा त्यांच्यावतीने
टँकर भाड्याने घ्यावा. त्यांना ऑक्सीजन पुरविण्यात येईल.
पालकमंत्र्यांनी पुण्यातील
उत्पादक कंपन्यांशी साधला संपर्क
पालकमंत्री श्री. पाटील
यांनी पुणे येथील इनॉक्स, टीएनएस या ऑक्सीजन उत्पादक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी तसेच उपाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला. कोल्हापूर येथील कंपन्यांना
पुरवठा वाढविण्याबाबत त्यांनी मागणी केली. यानुसार सीपीआर रुग्णालयात पाच मे. टन
ऑक्सीजन देण्याचे तसेच कोल्हापूर मधील ऑक्सीजन पुरवठादारांना वाढीव ऑक्सीजन
पुरविले जाईल, असे सांगितले.
पालकमंत्री श्री. पाटील
यांनी जिल्ह्याची 49 मे.टन वैद्यकीय रुग्णालयांची ऑक्सीजनची मागणी पूर्ण
करण्यासाठी दोन टँकर भाडे तत्वावर करार करावेत. तसा प्रस्ताव तात्काळ विभागीय
आयुक्त यांच्याकडे पाठवावा, असे सांगून त्यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी
संपर्क साधून या प्रस्तावाला मान्यता देण्याची सूचना केली.
याबैठकीला
एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी धनंजय इंगळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक
सतीश शेळके, महालक्ष्मी प्रा.लि.चे जितेंद्र गांधी, अध्यक्ष रणजित शहा, विश्वास
पाटील, सचिन शिरगावकर, अमर तासगावे,
कोल्हापूर गॅसचे राजेंद्र गाडवे आदी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.