कोल्हापूर,
दि. 10 (जिमाका) : भारत
सरकार वित्त मंत्रालय व एसएलबीसी महाराष्ट्र राज्याच्या निर्देशानुसार
जिल्ह्यामध्ये अग्रणी जिल्हा कार्यालयाच्यावतीने सर्व बँकांचा क्रेडीट ऑउटरिच
कॅम्पचे आयोजन दि. 11 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. तथापि दि. 11 ऑक्टोबर रोजी
जिल्हा बंदची घोषणा करण्यात आल्याने या मेळाव्याला उपस्थित राहण्यास ग्राहकांना
अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हा मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती अग्रणी
जिल्हा प्रबंधक गणेश शिंदे यांनी दिली आहे.
क्रेडीट ऑउटरिच कॅम्प दि.14
ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत श्रीराम सांस्कृतिक हॉल, बाजार पेठ जवळ,
कसबा बावडा, कोल्हापूर येथे होणार असून गडहिंग्लज येथे दि. 13 ऑक्टोबर रोजी आयोजित
मेळाव्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही श्री. शिंदे यांनी पत्रकाव्दारे
कळविले आहे.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.