कोल्हापूर,
दि. 14 (जिमाका) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा येथे प्रधान मंत्री
कौशल्य विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत विविध व्यवसायातील
अल्पमुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम राबविण्यात येणार असून त्यापैकी अल्पमुदतीचे
अभ्यासक्रम त्वरित सुरु होत आहेत. संस्थेतील आधुनिक यंत्रसामुग्रीवर या प्रशिक्षण
संस्थेतील तज्ञ व्यवसाय निदेशकांकडून मोफत देण्यात येणार आहे.
सीएनसी प्रोग्रॅमर -डीप्लोमा इन मेकॅ. इंजिनिअरींग, एनएसक्यूएफ लेवल-4, किमान 18 वर्षे
वयोमर्यादा. रिपेअर वेल्डर- आयटीआय
वेल्डर/ एमएमव्ही/ डीएलएम डीप्लोमा, एनएसक्यूएफ लेवल-4, किमान 18 वर्षे वयोमर्यादा. असेंब्ली ऑपरेटर- 10 वी पास, एनएसक्यूएफ लेवल-4, किमान 18 वर्षे
वयोमर्यादा. फील्ड टेक्निशियन एसी- 8 वी पास/ आयटीआय/डिप्लोमा, एनएसक्यूएफ लेवल-4,
किमान 18 वर्षे वयोमर्यादा.गॅस टंगस्टंग
आर्क वेल्डींग- 10 वी पास आयटीआय पास, एनएसक्यूएफ लेवल-4, किमान 18 वर्षे
वयोमर्यादा. सेल्फ एम्पॉयड टेलर- 8 वी
पास, एनएसक्यूएफ लेवल-4, किमान 14 वर्षे वयोमर्यादा. ऑटो बॉडी टेक्निशियन लेवल- 10 वी पास, एनएसक्यूएफ लेवल-3. ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रिशियन- आयटीआय पास, एनएसक्यूएफ लेवल-4. ब्युटी थेरपिस्ट- 10 वी पास, एनएसक्यूएफ
लेवल-4, किमान 18 वर्षे वयोमर्यादा. फुड
ॲण्ड बेवरेज सर्व्हिस-स्टीवर्ड- 10 वी पास, एनएसक्यूएफ लेवल-4, किमान 18 वर्षे
वयोमर्यादा. हेयरड्रेसर- 8 वी पास, एनएसक्यूएफ
लेवल-4, किमान 18 वर्षे वयोमर्यादा अशी राहिल व सर्व अभ्यासक्रम प्रशिक्षण मोफत
असणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी त्वरित
औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कळंबा रोड, कोल्हापूर येथे सकाळी 11 ते 5 या वेळेत
संपर्क साधावा. प्रवेशाच्या नोंदणीसाठी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र, आधार कार्ड
झेरॉक्स व स्वत:चा फोटो 2 प्रतीत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.
हे अभ्यासक्रम पूर्ण
करणाऱ्या उमेदवारांना केंद्रशासनामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे
प्रमाणपत्र खासगी क्षेत्रातील उद्योगधंद्यांमध्ये रोजगार मिळण्यासाठी उपयुक्त आहे.
स्वयंरोजगार करणाऱ्या तसेच करु इच्छिणाऱ्या उमेदवारांना देखील त्यांच्या
उद्योगधंद्यामधील विकासासाठी या प्रमाणपत्राचा उपयोग होणार आहे. सर्व इच्छुक
उमेदवारांनी या संधीचा लाभ घेऊन लवकरात-लवकर नाव नोंदणी करुन प्रशिक्षण पूर्ण करुन
घ्यावे. प्रशिक्षण पूर्ण होणाऱ्या उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार संधीबाबत
मार्गदर्शन करण्यात येईल.
अधिक माहितीसाठी दूरध्वनी
क्र. 0231-2323559 येथे संपर्क साधावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या
प्राचार्यानी केले आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.