सोमवार, १८ ऑक्टोबर, २०२१

विशेष समुपदेशन फेरीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर येथे प्रवेशासंदर्भात शिल्लक जागेवरील प्रवेशासाठी विशेष समुपदेशन फेरी बुधवार दि. 20 ते 30 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहे. यासाठी यापूर्वी नोंदणीकृत उमेदवारांनी ज्या त्या दिवशी सकाळी 8 ते 11 या वेळेत संस्थेत उपस्थित राहून ऑनलाईन हजेरी नोंदवण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.

 नोंदवलेल्या हजेरीमधील उमेदवारांची गुणवत्ता यादी त्याच दिवशी दुपारी 1 वा. संस्थास्तरावर प्रसिध्द करण्यात येईल व यादीमधील उमेदवारांनी त्याच दिवशी संस्थेत आवश्यक मूळ कागदपत्रे व फीसह उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित करावयाचा आहे. प्रत्येक दिवसांच्या हजेरीवरुन त्या दिवसांची गुणवत्ता यादी तयार होणार आहे याची प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावयाची आहे.

00000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.