कोल्हापूर,
दि. 6 (जिमाका) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर
येथे प्रवेशासंदर्भात शिल्लक जागांचा
तपशील तसेच समुपदेशन फेरीकरिता एकत्रित गुणवत्ता यादी दि. 9 ऑक्टोबर रोजी सायं. 5 वा. प्रसारित
करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप प्रवेश अर्ज भरलेले नाहीत त्यांनी
दिनांक 7 ऑक्टोबरपर्यत ऑनलाईन प्रवेश अर्ज भरावेत, असे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.
ज्या
उमेदवारांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरलेले आहेत तथापि चौथ्या प्रवेश फेरी अखेर प्रवेश
मिळालेला नाही असे उमेदवार तसेच ज्यांनी
समुपदेशन फेरीसाठी अर्ज भरलेला आहे, या सर्व
उमेदवारांनी दिनांक 10 ते 12 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11 ते सायं 5 पर्यत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
कोल्हापूर येथे उपस्थित राहून आपली हजेरी नोंदवायची आहे. या नोंदणी झालेल्या
उमेदवारांमधूनच दिनांक 13 ऑक्टोबर रोजी संस्थास्तरीय गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
दि. 14 ते 17 ऑक्टोबरपर्यत शासकीय औद्योगिक
प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर येथे रिक्त
राहिलेल्या जागेसाठी प्रवेश प्रक्रीया राबविली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी दि. 10 ते 12 ऑक्टोबरपर्यत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण
संस्था, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून ऑनलाईन हजेरी नोंदवावी.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.