मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

विजया दशमी दिवशी आपट्याच्या रोपांचे संवर्धन व जतन करण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 12 (जिमाका) : विजयादशमी दसरा उत्सव दि. 15 ऑक्टोबर रोजी साजरा होत आहे. दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या झाडांची पुजा केली जाते आणि त्याचे पाने आपल्या प्रियजनांना भेट स्वरुपात दिले जातात. या दिवशी सोन घ्या, सोन्यासारखं रहा अस म्हणत आपट्याची पाने वाटून एकमेकांना शुभेच्छा देऊन सण साजरा केला जातो. सामाजिक वनिकरण विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे की, या दिवशी अशा मौल्यवान वृक्षाचे संवर्धन व जतन करणे गरजेचे आहे. या महत्वाच्या दिवशी या रोपांचे वाटप व लागवड करुन नैसर्गिक स्त्रोत्र व निसर्गाची जोपासना करावी.

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.