मंगळवार, ५ ऑक्टोबर, २०२१

मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

 


कोल्हापूर, दि. 5 (जिमाका) : 4 ते 10 ऑक्टोबर  हा मानसिक आरोग्य सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो. या सप्ताहानिमित्त मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम यांनी दिली आहे.

या सप्ताहानिमित्त पाककृती, मेणबत्त्या बनविणे, आकाशकंदिल बनविणे, रांगोळी, मेहंदी, वाद्य वाजविणे व चित्रकला या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित रुग्णांनी मानसोपचार विभाग, सेवा रुग्णालय, कसबा बावडा येथे 8 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत नोंदणी करावी. नोंदणी केलेल्या व्यक्तींचे स्टॉल व स्पर्धा दि. 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत घेण्यात येणार आहे. सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमच्या मानसोपचारतज्ञ डॉ. अर्पणा कुलकर्णी यांनी केले आहे.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.