बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेंतर्गत संसाधन व्यक्तींच्या नामिकासुचीसाठी अर्ज करावेत

 

कोल्हापूर, दि. 20 (जिमाका): ‘प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना’ या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्य नोडल एजन्सीच्यावतीने जिल्हास्तरावर लाभार्थ्यांना प्रकरणे तयार करण्यासाठी सहाय्य करण्यासाठी संसाधन व्यक्तींची नामिकासूची तयार करावयाची आहे. पात्र व्यक्तींनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर कार्यालयात 25 ऑक्टोबर पर्यंत बंद लिफाफ्यातून अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

यासाठी पात्रता-अन्न शास्त्र व तंत्रज्ञान या विषयातील पदवी किंवा पदविकाधारक व अनुभव असलेल्यांना प्रथम प्राधान्य. अन्न शास्त्र व तंत्रज्ञान या विषयातील पदवी किंवा पदविकाधारक व अनुभव असलेल्यांना व्दितीय प्राधान्य. कृषी शास्त्रामध्ये पदवी असून अन्नप्रकियेचे डीपीआर बनविण्यासंदर्भात अनुभव असणाऱ्यांना तृतीय प्राधान्य.

अधिक माहितीसाठी www.krishi.maharashtra.gov.in  हे संकेतस्थळ पहावे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.