बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

पंतप्रधान शिष्यवृत्तीसाठी माजी सैनिकांच्या पाल्यांना 30 नोव्हेंबरपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

कोल्हापूर, दि. 6 (जिमाका) : जिल्ह्यातील माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या पाल्यांना केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्यामार्फत पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ज्या पाल्यांनी 12 वी परीक्षेत व पदवी परीक्षेत किमान 60 टक्के गुण मिळविले आहेत व त्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे अशा पाल्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.  

शिष्यवृत्तीसाठीची अधिक माहिती www.ksb.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज दि. 30 नोव्हेंबरपूर्वी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (निवृत्त) यांनी केले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.