कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): कोल्हापूर
शहर हॉटेल व रेस्टॉरन्टधारक असोसिएशन आणि अन्न व औषध प्रशासन, कोल्हापूर यांच्या
संयुक्त विद्यमाने शहरातील हॉटेल व रेस्टॉरन्टकरिता कार्यशाळा संपन्न झाली. अन्न सुरक्षा
व मानके कायदा २००६ अंतर्गत लागू झालेल्या नवनवीन तरतुदींची माहिती देण्याकरीता
आणि केंद्रिय अन्न सुरक्षा अधिकारी, नवी दिल्ली यांनी सुरु केलेल्या ईट राईट
इंडिया या कार्यक्रमाचाच भाग असलेल्या खाता स्वच्छता मानांकन" "रुको"
आणि "सरप्लस फूड" या उपक्रमाबाबत माहिती देण्याकरीता कार्यशाळेचे आयोजन
करण्यात आले होते.
कार्यशाळेमध्ये हॉटेल व रेस्टॉरन्ट व्यवसायिकांना प्रशासनातर्फे
स्वच्छता मानांकन करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. स्वच्छता मानांकनाबाबत माहिती
आणि त्याचे फायदे व्यावसायिकांना समजावून सांगण्यात आले. हॉटले व रेस्टॉरन्ट
व्यावसायिकांनी वापरुन काळे पडलेले खाद्यतेल पुन्हा न वापरता रुको उपक्रम अंतर्गत
बायोडिझेल उत्पादक कंपनीचे स्थानिक प्रतिनिधी यांना देण्याबाबत मार्गदर्शन व आवाहन
यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर शहरामध्ये दररोज हॉटेल व रेस्टॉरन्टमध्ये तसेच विविध
समारंभांमध्ये वाया जाणारे अन्न हे सरप्लस फूड या उपक्रमाअंतर्गत फेकून न देता
शहरामध्ये निस्वार्थीपणे काम करणाऱ्या प्रशांत मंडलिक यांना देऊन सहकार्य करण्याचे
देखील आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.
सर्व हॉटेल-रेस्टॉरन्ट व्यावसायिकांना यापुढे त्यांच्या
बीलावर त्यांचा परवाना क्रमांक छापणे दि. 1 जानेवारी 2022 पासून बंधनकारक होणार
असल्याची माहिती देण्यात आली.
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त श्री.
शिगाई, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. कदम, श्री मासाळ आणि श्री. पाटील यांनी तसेच
अरिस बायोएनर्जी या बायोडिझेल उत्पादक कंपनीचे तसेच कोल्हापूर शहरामध्ये वाया
जाणारे अन्न गरजू व्यक्तिंपर्यंत पोहचविणारे प्रशांत मंडलिक यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेस कोल्हापूर शहर हॉटेल व रेस्टॉरन्टधारक असोसिएशनचे अध्यक्ष श्री. नागेशकर,
श्री. लाटकर, श्री. शानबाग व इतर हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.