मंगळवार, २६ ऑक्टोबर, २०२१

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये शुक्रवारी कोविड-19 लसीकरण कॅम्पचे आयोजन

 

कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या तंत्र शिक्षण विभाग व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये दि. 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत ‘मिशन युवा स्वास्थ अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचे 18 ते 22 वयोगटातील विद्यार्थी, विद्यार्थीनी त्यांचे पालक, संस्थेचे अधिकारी, कर्मचारी त्यांचे नातेवाईक यांचे 100 टक्के लसीकरण होण्याच्या दृष्टिने शासकीय तंत्रनिकेतन कोल्हापूर (विद्यानगर, राजाराम महाविद्यालयाच्या पाठीमागे) येथे शुक्रवार दि. 29 ऑक्टोबर रोजी 10 ते 12 या वेळेत कोविड-19 लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय गर्गे यांनी सर्वांनी उपस्थित राहून लसीकरण करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.