कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): जिल्ह्यातील
वंचित घटकांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढण्यासाठी सर्व तृतीयपंथी, देहव्यापार
करणा-या महिला, दिव्यांगांनी मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण
कार्यक्रमात सहभाग नोंदवावा. या कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करणे
तसेच मतदार यादीतील मतदाराच्या तपशीलाची दुरूस्ती करता येणार आहे. मतदार यादीत
नावाची नोंद असेल तरच निवडणुकीत आपल्याला मतदानाचा हक्क बजावता येतो. यासाठी वंचित
घटकांतील नागरिकांनी या कार्यक्रमातंर्गत आपली नोंदणी प्राधान्याने करावी, असे
आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.
भारत
निवडणूक आयोगाचा दिनांक 01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार
यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि.1 ते 30 नोव्हेंबर 2021 या
कालावधीत होणार आहे. विशेष मोहीम दि. 13 ते 14 नोव्हेंबर 2021 व 27 ते 28
नोव्हेंबर 2021 रोजी होईल.
तदनुसार विशेष संक्षिप्त कार्यक्रमाची व्यापक प्रमाणात प्रसिध्दी करण्याबाबत व
त्यामध्ये समाजातील वंचित घटक, जसे देह व्यापार करणा-या महिला, तृतीयपंथी व
दिव्यांग यांच्या मतदार नोंदणीवर भर देण्याचे आयोगाने निर्देशित केले आहे.
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी
पात्र परंतु, अद्यापही मतदार यादीत नाव सामाविष्ट नसलेल्या समाजातील वंचित घटक, जसे
देह व्यापार करणा-या महिला, तृतीयपंथी व दिव्यांग यांचे मतदार यादीत नाव सामाविष्ट
करण्यासाठी संधी उपलब्ध झाली असून वंचित घटक मतदारांनी आपल्या आवश्यकतेप्रमाणे
खालील अर्ज भरुन द्यावेत.
नमुना
क्रमांक 6 (मतदार यादीत नाव सामाविष्ट करावयासाठी अर्ज), नमुना
क्रमांक 7 (मतदार यादीतील नावांची वगळणी करावयासाठी अर्ज), नमुना
क्रमांक 08 (मतदार यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी अर्ज), नमुना
क्रमांक 08 अ (एकाच मतदारसंघात मतदार यादीचे नोंदीच्या स्थानांतर करण्यासाठी अर्ज)
वंचित घटक मतदारांनी आपल्या
आवश्यकतेप्रमाणे वरील नमुने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा संबंधित तालुक्यातील
तहसिल कार्यालय (निवडणूक शाखा) व कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये रहिवास करत
असलेल्या मतदारांनी एल.बी.टी.शाखा, शिवाजी मार्केट, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर
यांच्याकडे सादर करावेत किंवा आयोगाने विकसित केलेल्या https://www.nvsp.in/ या आज्ञावलीवर अथवा Voter Helpline
App या आज्ञावलीवर
ऑनलाईन पध्दतीने करावेत.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.