शुक्रवार, २२ ऑक्टोबर, २०२१

ई-पॉस उपकरणाव्दारे शिधापत्रिकेतील व्यक्तीच्या आधार क्रमांकाचे सिडींग करावे

 


कोल्हापूर, दि. 22 (जिमाका): राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय व प्राधान्य शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे आधार सिर्डींग १०० टक्के पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. दि. २३ ऑक्टोबर पूर्वी प्रत्येक लाभार्थी रेशनकार्डवरील सर्व व्यक्तिंचे १०० टक्के आधार सिडींग आणि प्रत्येक शिधापत्रिकेसाठी किमान एक वैध मोबाइल क्रमांक लिंक करण्यात येणार आहे. नियमित धान्य मिळणाऱ्या अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय व प्राधान्य गटातील लाभार्थ्यांनी धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई-पॉस उपकरणाव्दारे आपल्या शिधापत्रिकेतील ज्या व्यक्तीचे आधार क्रमांकाचे सिडींग करण्यात आले नाही त्यांनी रास्तभाव दुकानदाराकडे आधार कार्ड घेऊन जावे आणि सिडींग पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.

रास्तभाव दुकानांतील ई-पॉस उपकरणांमधील e-KYC व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करून आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे. आधार सिडींग करण्यात काही अडचणी येत असतील तर संबंधित तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेशी  संपर्क साधावा. दि. २३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आधार सिडींग न झालेल्या व्यक्तिंचे अनुज्ञेय धान्य माहे नोव्हेंबर २०२१ या महिन्यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित करण्यात येणार आहे.

0000000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.