शनिवार, २३ ऑक्टोबर, २०२१

कोल्हापूर शासकीय ITI येथे 26 ऑक्टोबर अखेर नव्याने प्रवेश अर्ज भरता येणार

 


 

            कोल्हापूर दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): कोल्हापूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे 2021 सत्रासाठी प्रवेश अर्ज करणे शक्य झाले नाही, प्रवेश अर्ज भरताना चुका झाल्या अशा उमेदवारांना 26 ऑक्टोबर 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत नव्याने प्रवेश अर्ज http://admission.dvet.gov.in या वेबसाईट भरता येणार आहे.

        तसेच, प्रवेश अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांनी प्रवेश प्रक्रियेसाठी 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता संस्थेत प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी केले आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.