गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून पदभरती

 


 

कोल्हापूर, दि. 28 (जिमाका): स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये माजी सैनिक प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात एकूण 7 हजार 425 सुरक्षा रक्षक पदांची भरती (कायमस्वरुपी) करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या इच्छुक माजी सैनिकांनी 3 नोव्हेंबरपर्यंत आपल्या डिसचार्ज पुस्तक, ओळखपत्र व एम्लॉयमेंट कार्डसह सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे प्रत्यक्ष भेट देवून आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

यासाठी उमेदवाराचे वय 1 ऑक्टोबर रोजी 45 वर्षापेक्षा कमी असावे, कमीत कमी 8 वी पास पण 12 वी पास नसावा, कमीत कमी 15 वर्षे सैन्यसेवा, जास्तीत-जास्त Hav and Below, सैन्यातील चारित्र्य कमीत-कमी गुड व AYE/SHAPE-I याप्रमाणे शारिरीक व शैक्षणिक पात्रता राहील.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.