कोल्हापूर,
दि. 25 (जिमाका): सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर कार्यालयाच्या अधिनस्त मुलां-मुलींच्या
शासकीय वसतिगृहांमध्ये अनु.जाती, विजाभज, इमाव व विमाप्रवर्गामधील ८ वी, ११वी व
प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेणाऱ्या सन २०२१-२२ मधील प्रवेशित विद्यार्थ्यांना
विनामूल्य प्रवेश देण्याचे सुरू आहे. गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठीचे अर्ज
संबंधित तालुक्याच्या वसतिगृह अधिक्षक यांच्याशी संपर्क साधून अर्ज प्राप्त करून
घेऊन आवश्यक कागदपत्रासह परीपूर्ण प्रवेश अर्ज संबंधित वसतिगृह अधिक्षकांकडे सादर
करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.
वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना गणवेश,
शैक्षणिक साहित्य, नाष्टा, दोन वेळचे जेवण व राहण्याची सोय, ग्रंथालय, निर्वाह
भत्ता, मनोरंजन कक्ष, जिम या विनामूल्य सोयी असणार आहेत. अधिक माहितीसाठी संबंधित
वसतिगृहाचे गृहपाल आणि सहायक आयुक्त समाज कल्याण, कार्यालय, विचारे माळ, कोल्हापूर
येथे समक्ष किंवा दूरध्वनी क्र. ०२३१-२६५१३१८ याव्दारे संपर्क साधावा.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.