कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): जगभरात ९ ऑक्टोबर हा जागतिक टपाल दिन साजरा केला जातो. या निमित्ताने भारतीय डाक
विभागातर्फे ९ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रीय डाक सप्ताह साजरा करण्यात येत
आहे. कोल्हापूर डाक विभागातील सर्व कार्यालये या राष्ट्रीय डाक सप्ताहात सहभागी
होत आहेत, अशी माहिती प्रवर अधीक्षकांनी दिली आहे.
यावर्षीच्या राष्ट्रीय डाक सप्ताहांतर्गत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजारा केला जात आहे.
यावर्षी डाक
विभागामार्फत अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रम राबवून हा डाक सप्ताह साजरा
केला जात आहे. या संपुर्ण डाक सप्ताहात जे
खातेदार टपाल खात्याच्या १२ विविध प्रकारातील सर्व प्रकारची खाती उघडतील ( उदा. SB, NSC,
KVP,PPF, Sukanya Samrudhi, Time Deposit (4 types), RD, MIS & Senior,
Citizen) त्यांना विषेश सन्मानाने सन्मानीत करण्यात येणार
आहे.
१2 ऑक्टोबर रोजी
डाक जीवन विमा दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी डाक जीवन विमा आणि ग्रामीण डाक
जीवन विमा योजना प्रत्येक पोस्ट कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात येईल. २० लाख किंवा
त्यापेक्षा अधिक रकमेची पॉलीसी घेणा-या विमाधारकास विशेष सन्मानाने सन्मानीत
करण्यात येणार आहे.
१३ ऑक्टोबर रोजी फिलॅटेली दिवस साजरा केला जाणार आहे. त्या दिवशी तिकीट संग्राहक विजयकुमार जोशी यांनी संग्रहीत केलेल्या तिकीटांचे प्रदर्शन सर्व निर्धारीत Covid -19 बाबतचे नियम
पाळून कोल्हापूर प्रधान डाक घर येथील NDC इमारतीमध्ये भरवण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी हे दुर्मिळ तिकीट प्रदर्शन आवर्जुन पाहण्यास यावे.
१४ ऑक्टोबर रोजी व्यवसाय वृध्दी दिवस साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी विविध ठिकाणी आधार एनरोलमेंट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
१६ ऑक्टोबर रोजी Mails Day अर्थात टपाल दिवसाचे आयोजन केले गेले आहे. या दिवशी “आजादी का अमृत महोत्सव” या विषयावर खुली निबंध स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे.
निबंध फक्त पोष्टाच्या ५ रु. च्या लिफाफ्यामधुन/ Speed Post/ Register Post अथवा Inland Card वरच लिहुन
पाठवावे. By Hand, e-mail वर पाठविलेले निबंध विचारात घेतले जाणार नाहीत. स्पर्धेची अंतिम तारीख 17
ऑक्टोबर राहील.
१.
लिफाफ्यावर “आज़ादी का अमृत महोत्सव” असे लिहावे.
२.
निबंध लिहिण्या-याचे नाव, वय, पत्ता व मोबाईल क्रमांक स्पष्ट हस्ताक्षरात
लिहावे.
३.
निबंध १०० ते १५० शब्दांचा
असावा.
४.
स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली
असेल.
५.
उत्कृष्ट निबंधांना भारतीय डाक
विभागामार्फत गौरवान्वित करण्यात येईल.
६.
निबंध “ वरिष्ठ
अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर ४१६ ००३ या
पत्त्यावर दि. १८ ऑक्टोबर २०२१ पर्यंत
पाठवावेत.
७.
स्पर्धेचे सर्व अधिकार प्रवर अधीक्षक
डाकघर, कोल्हापूर विभाग यांच्याकडे राखीव असतील.
सर्व नागरिकांनी
या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या
नजीकच्या पोस्ट कार्यालयाशी संपर्क करावा, असे आवाहनही पोस्ट
कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.
0000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.