गुरुवार, १४ ऑक्टोबर, २०२१

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा दौरा


कोल्हापूर, दि. 14 (जिमाका) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वा. श्री महालक्ष्मी मंदिर येथे आगमन व श्री महालक्ष्मी (अंबाबाई) देवीचे दर्शनास उपस्थिती. (स्थळ:- श्री महालक्ष्मी देवी मंदिर, कोल्हापूर). सकाळी  8.45 वा. श्री महालक्ष्मी मंदिर येथून श्री क्षेत्र जोतिबा मंदिराकडे प्रयाण. सकाळी 9.30 वा. श्री क्षेत्र जोतिबा मंदिर येथे आगमन व श्री जोतिबा मंदिर येथे दर्शनास उपस्थिती (स्थळ:- श्री जोतिबा मंदिर, कोल्हापूर). सकाळी 10 वा. कोल्हापूर येथून कागल निवासस्थानाकडे प्रयाण. 10.45 वा. कागल निवासस्थान येथे आगमन व राखीव. सोईनुसार  राजू शानेंदिवान यांच्या कार्यक्रमास उपस्थिती ( माहितीस्तव : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावरती बॉयलर पुजन कार्यक्रम (स्थळ :- बेलेवाडी काळम्मा, ता. कागल ). सोईनुसार कागल येथे नवीन सुरु होणाऱ्या निल लावण्य या शाही वस्त्रदालनाचे उद्घाटन (स्थळ :- चौगुले हॉस्पिटल शेजारी, कोष्टी गल्ली, कागल). सोईनुसार सोमनाथ लोहर यांच्या नवीन सुरु होणाऱ्या सर्व्हिसिंग सेंटरचे उद्घाटन (स्थळ:- कल्याणी प्लाझा कागल) कागल निवासस्थान येथे राखीव. दुपारी 3.15 वा. कागल निवासस्थान येथून हमिदवाडाकडे प्रयाण व आगमन. दुपारी 4 वा. सर्वोदय शासकीय व निमशासकीय व ग्रह तारण पतसंस्थेचे उद्घाटन, (स्थळ:- हमिदवाडा कारखाना साईट हमिदवाडा, ता. कागल). सायं. 5 वा. हमिदवाडा येथून कागल निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व राखीव.

शनिवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते १० वा. कागल निवासस्थानी अभ्यागतांच्या भेटी-गाठी (स्थळ:- कागल निवासस्थान, कागल)  व राखीव

रविवार, दि. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा. कागल निवासस्थान येथून मोटारीने सातारमार्गे पुण्याकडे प्रयाण.  सायं. 6.30 वा. कागल निवासस्थानी आगमन व राखीव.

सोमवार, दि. 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.30 वा. कागल येथून कोल्हापूरकडे प्रयाण. सकाळी  11 वा. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कार्यकारी समितीची सभा (स्थळ : केडीसीसी बँक, कोल्हापूर). दुपारी  12.30 वा. कोल्हापूर येथून कागल निवासस्थाकडे प्रयाण, आगमन व राखीव.

मंगळवार, दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 ते 10 वा. कागल निवासस्थानी अभ्यागतांच्या भेटी-गाठी (स्थळ:- कागल निवासस्थान, कागल), राखीव. दुपारी 4.30 वा. कागल निवासस्थान येथून कोल्हापूरकडे प्रयाण. सायं. 5 वा. कागल निवासस्थान येथून बेळगांव विमानतळाकडे प्रयाण.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.