कोल्हापूर, दि. 8
(जिमाका): मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राच्या पोल्ट्री फार्ममधील 72 आठवडे पूर्ण
झालेल्या ब्लॅकॲस्ट्रलॉर्प जातीच्या कुक्कुट पक्षांची (10 मादी : 1 नर) प्रति किलो
रु. 75 प्रमाणे दि. 11 ऑक्टोबरपासून विक्री करण्यात येणार आहे. तरी गरजूंनी
मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, नवीन सर्कीट हाऊस जवळ, ताराबाई पार्क, कोल्हापूर
कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे पशुसंवर्धन
सहायक आयुक्तांनी केले आहे.
कुक्कुट
पक्षी विक्रीची वेळ सकाळी 10 ते 12 व दुपारी 3 ते 4 (शासकीय सुट्टी सोडून) अशी
राहील. अधिक माहितीसाठी 0231-2651729 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.