सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

माहिती अधिकार अधिनियमाची माहीती असणे ही काळाची गरज - डॉ. यु. एन. वळवी.

 


 

 कोल्हापूर, दि. 25 (जिमाका): सहायक आयुक्त, समाज कल्याण, कोल्हापूर डी. के. शिंदे समाजकार्य महाविद्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात माहीती अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत जिल्ह्यामधील विजाभज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, निवासी शाळेचे मुख्याध्यापक, मुलांचे मुलींचे वसतिगृह अधीक्षक कार्यालयामधील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता नुकतेच प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

प्रशिक्षणाकरीता कोल्हापूर जिल्हयामधील विजाभज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, निवासी शाळेचे मुख्याध्यापक, मुलांचे मुलींचे वसतिगृह अधीक्षक कार्यालयामधील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच समतादूत उपस्थित होते.

माहिती अधिकार अधिनियमास 16 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून या प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी दिली.

डी. के. शिंदे समाजकार्य महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक डॉ. यु. एन. वळवी  यांनी मार्गदर्शन केले.  यावेळी  त्यांनी  माहीती अधिकार अधिनियमाची कर्मचा-यांमध्ये असणा-या माहीतीचा अभाव असल्याने बहुतांशी कर्मचा-यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून योग्य परिपूर्ण अभ्यासाने या भीतीचे रूपांतर सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणाकरीता कशा प्रकारे करता येईल याबाबत विवेचन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी तर आभार प्रदर्शन कार्यालय अधीक्षक सचिन पाटील सूत्रसंचालन तालुका समन्वयक सचिन परब यांनी केले.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.